facebook वर एका मित्राने नविन फोटो टाकला होता.आईगं!!कसला झकास फोटो काढलेला त्याने....चिमणीच्या घरट्याचा अगदी जवळुन काढलेला.wow yarrr,lovelly<3 ,gr8 job dude अस त्याच्या फोटोचं कौतुकही होत होतं.भरमसाठ likes मध्ये मिही एकाची भर घातली....
सहज दादालाही सांगीतलं फोटो बघच म्हणुन.तो काहीच बोलला नाही.म्हणुन मग मिच विचारलं कसा वाटलारे फोटो???? तो अस्वथ वाटला..आणी मग अचानक
म्हणाला "परकेणा आणि भिती दिसतेय का त्या पाखराच्या डोळ्यात तुम्हाला??"
तो असं का म्हणतोय याच्या विचारात असतानाच तो बोलला "पारअगदी तिच्या घरात घुसुन
फोटो काढताय,उद्या जर कोणी तुमच्या घरात घुसुन फोटो काढायला लागलं तर आरडाओरडा
कराल,चार शिव्या देउन घराबाहेर हाकलाल."
तो सलग रागारागानं बोलत होता.पण त्यातलं काहीच चुकीच वाटत नव्हंत.
"पण ती नाही बोलु शकणार आहे काही तुम्हाला,केवढासा जिव तो बिचारा....
उथळणा म्हणतात ना तो हाच,गरीब बिचारा एवढासा जिव तो म्हणुन घुसलात त्याच्या घरात
आणि काढलेत त्याचे फोटो."तु एकच सांग ताई ........नाग असता समोर एखादा फणा काढलेला तर झाली असती का हिंमत त्याच्यासमोर कँमेरा घेउन नाचायची ??नाहीना??
"मग नकारे असे वागु ,तो ही जिव आहे त्यालाही जगणं आहे,घर आहे,आकाश
आहे."त्याला कँमेरयात बंद करा,पण तुमच्या जगातुन,त्याच्या जगात घुसुन नव्हे,जाणिवा जाग्रुत ठेवा बोथट नका होउ देउ"
एवढ बोलुन तो निघुन गेला.खरंच किती खरं बोलला होता तो.मला किंवा आम्हा बरयाच जणांना फक्त तो clear फोटो दिसला होताय,त्याचं घरटं,गवत,आणि ति टक लावुन
बघणारी नजर दिसली होती त्या नजरेतलि भिति आणी परकेणा नाही.एरवी स्वताची place
जपणारे आम्ही त्याच्या छोट्याश्या जगात किती नालायकपणे लुडबुड करत होतो याची जाणीव झाली.
photography च्या परीक्षेत आज माझा मित्र जिंकला असेल पण 'संवेदनशील'
photography च्या परिक्षेत नाही.खरच दादा बरोबर होता आम्हीच वेगळे आणी बोथट वागत होतो जाणिवा मेल्यासारखे........
आजि म्हणायची
"चिमण्या पाखरांसंगे मि पहाटे जुने माझे बोलीन"आज कळल ती चिमणि पाखर आमच्याशी का बोलेनाशि झाली आहेत तें...................,
-मानसी देवधर.
Tuesday, 27 August 2013
चिउताई....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment